अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळे संजय राऊत संतापले, म्हणाले..

“केंद्रीय पथकं कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत असतील तर हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे”

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच केंद्रीय पथकं कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत असतील तर हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे असंही ते म्हणाले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

“हा दबावाचा प्रश्न नाही, तर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात आहे याचा उल्लेख असल्याचं मी वारंवार सांगत आहे. या तक्रारींचा तपास या राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे करु शकतात, न्यायालयं आहेत. तरीदेखील मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात असतील तर शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहे.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *