मुंबई – भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी आयोगापुढे पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये साक्ष नोंदवण्यात येणार आहे. न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगाने रश्मी शुक्ला यांना १८ आणि १९ जानेवारी रोजी साक्ष देण्याकरिता आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीकरिता राज्य सरकारकडून न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाकडून पुण्याच्या तत्कालीन पोलीस कमिश्नर रश्मी शुक्ला यांना यापूर्वी सुद्धा दोन वेळा समन्स पाठवून चौकशीला बोलवण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या साक्ष नोंदणीदरम्यान रश्मी शुक्ला यांनी महत्त्वाचे कागदपत्र न आणल्याने पहिल्यावेळी त्यांची चौकशी करण्यात आली नव्हती. त्यांना पुढील सुनावणीदरम्यान सर्व कागदपत्र आणण्याचे आयोगाकडून सांगण्यात आले होते. आता पुन्हा आयोगाकडून रश्मी शुक्ला यांना दोन दिवस चौकशीला उपस्थित राहण्याचा समन्स आयोगाकडून देण्यात आला आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगासमोर या प्रकरणातील तपासात साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याचे निर्देश रश्मी शुक्ला यांना आयोगाने दिले आहेत, मात्र सोमवारी आयोगाची सुनावणी झाली नाही.
One comment
Pingback: wongkito4d