५४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

सुयश गरगटे व प्रियांका इंगळे कर्णधार
मुंबई – सोलापूर येथे झालेल्या ५७ व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून निवड समिती सदस्य नामदेव गोमारे (लातूर), महेंद्र गाढवे (सातारा), कमलाकर कोळी (ठाणे) व नेहा तपस्वी (पुणे) यांनी निवडलेले महाराष्ट्राचे पुरुष-महिला संघ महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. या संघाचे प्रशिक्षक म्हणून बिपीन पाटील (मुंबई) यांची पुरुष संघासाठी तर महेश (मयूर) पालांडे (ठाणे) यांची महिला संघासाठी निवड झाली आहे. या दोन्ही संघांना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार ॲड. अरुण देशमुख यांनी संपूर्ण क्रीडा गणवेश पुरस्कृ त केला आहे.
या संघास भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले व खजिनदार अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. जबलपूर, मध्य प्रदेश येथे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ५४ व्या राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद स्पर्धेत हे संघ सहभागी होणार आहेत. या संघाचे सराव शिबीर कुळगाव (जि. ठाणे) येथे सुरू झाले आहे.
पुरुष संघ : सुयश गरगटे (कर्णधार), प्रतिक वाईकर, मिलिंद कुरपे, सागर लेंगरे (सर्व पुणे), ऋषिकेश मुर्चावडे, अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर (सर्व मु. उपनगर), अरुण गुणकी, सुरज लांडे (सर्व सांगली), गजानन शेगाळ (ठाणे), राहुल सावंत (सोलापूर), राखीव : लक्ष्मण गवस (ठाणे), अभिषेक पवार (अ. नगर), श्रेयस राऊळ (मुंबई), प्रशिक्षक : बिपीन पाटील (मुंबई), व्यवस्थापक : सतीश कदम (सोलापूर).
महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), दिपाली राठोड, श्वेता वाघ, स्नेहल जाधव (सर्व पुणे), रुपाली बडे, रेश्मा राठोड, पूजा फरगडे (सर्व ठाणे), गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, जान्हवी पेठे (सर्व उस्मानाबाद), अपेक्षा सुतार, आरती कांबळे (सर्व रत्नागिरी), राखीव : अंकिता लोहार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी), संध्या सुरवसे (सोलापूर), प्रशिक्षक : महेश (मयूर) पालांडे (ठाणे), व्यवस्थापिका : नेहा तपस्वी (पुणे).

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …