ठळक बातम्या

१९४७ मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळाले

मुंबई/नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने नुकतीच एका समिटमध्ये हजेरी लावली, जिथे तिने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्येदेखील केली. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. या मुलाखतीदरम्यान कंगनाने थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले. कंगनाने ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर ही मुलाखत दिली आहे. यावेळी कंगना राणावत म्हणाली की, रक्त वाहणारच होते, पण भारतीयांचे रक्त वहायला नको होते. त्यांना माहीत होते आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. १९४७ मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळाले आहे. यावर मुलाखतकार कंगनाला म्हणाली की, म्हणूनच तुम्हाला लोक भगवा म्हणतात यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला, मात्र आता अभिनेत्रीवर जोरदार टीका होत आहे.
अभिनेत्री कंगनाच्या या वक्तव्यानंतर आता तिच्यावर जोरदार टीका होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, सोनू सूदने लोकांची मदत केली, त्याच्यावर आयटीने धाडी टाकल्या आणि ही व्यक्ती अशी काहीही बडबड करते तिला पद्मश्री दिला जातो. एका युजरने लिहिले की, कंगना म्हणाली त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, तिच्याकडून एवढीच अपेक्षा केली जाऊ शकते, त्यांच्या मते, सुभाषचंद्र/भगतसिंग/चंद्रशेखर यांनी काहीही केले नाही. त्रास या प्रकरणावर टाळ्या वाजवणाऱ्यांमुळे होतोय. आज देश येथे उभा आहे. एकाने लिहिले की, आमच्या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करणारे सरकार आता असते, तर असे लज्जास्पद विधान करणाऱ्या या महिलेवर आतापर्यंत गुन्हा दाखल झाला असता.
१७. हा वेडेपणा की देशद्रोह? – वरुण गांधींचा घणाघात
नवी दिल्ली – भाजप खासदार वरुण गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या पक्षाच्या सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावा की देशद्रोह?, असा सवाल वरुण गांधी यांनी केला. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर मिळाले. स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक दशकांच्या संघर्षानंतर १९४७ मध्ये जे मिळाले ते म्हणजे भीक, असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने नुकतेच केले होते. हे वक्तव्य करतानाची एक व्हिडीओ क्लिप शेअर करीत वरुण गांधी यांनी कंगनाचा समाचार घेतला. गांधी यांनी ट्विट केले की, कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान होतो, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर होतो, आता तर शहीद मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार होतोय. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?, असा घणाघात त्यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …