ठळक बातम्या

१६ जानेवारीची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लांबणीवर

नाशिक – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (एमएसईसी) वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षे (एनटीएस)बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन १६ जानेवारी, २०२२ रोजी करण्यात येणार होते. मात्र, प्रशासकीय कारणामुळे १६ जानेवारीची परीक्षा रद्द करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने या परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे उपायुक्त शैलजा दराडे यांनी कळवले आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते.
प्रज्ञाशोध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ जानेवारीला घेण्यात येणारी परीक्षा प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती आहे. १६ जानेवारीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याने नवी तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तर, राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा १२ जून रोजी होणार आहे. अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या शाळेतील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला देता येते. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गुणांची, वयाची आणि उत्पन्नाची अट नाही. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या अकरावी आणि बारावीच्या वर्गासाठी १२५० रुपये, तर पदवी शिक्षणासाठी दोन हजार रुपये आणि पुढील शिक्षणासाठी दोन हजार रुपये दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …