हार्बर मार्गावर डिसेंबरपासून सुधारित वेळापत्रक; एसी लोकलही धावणार

मुंबई – मध्य रेल्वे १ डिसेंबरपासून हार्बर, ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर म्हणजेच बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्ग यासाठी सुधारित उपनगरीय वेळापत्रक लागू करणार आहे, तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा दिली जाणार आहे.
कोविड काळात मुंबई उपनगरीय लोकल सेवेला मोठा फटका बसला होता, मात्र कोविडची दुसरी लाट ओसरल्यानंतर लोकल सेवा आता पूर्वपदावर आली आहे. त्यामुळेच रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक निर्णय घेण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून हार्बर मार्गासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करत एसी लोकलचे गिफ्टही या मार्गासाठी देण्यात आले आहे. हार्बर मार्गावर १ डिसेंबरपासून ही सेवा सुरू होत असून, सोमवार ते शुक्रवार एसी लोकलच्या १२ फेऱ्या होणार आहेत. त्याचवेळी अनेक लोकल सेवांचा विस्तारही करण्यात आला आहे.
———————————————————–
सुधारित वेळापत्रकात नेमके काय?
– सध्याच्या १२ सेवा वातानुकूलित सेवांनी बदलल्या जातील.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अंधेरी सेवा आणि पनवेल-अंधेरी सर्व सेवांचा गोरेगाव स्थानकापर्यंत विस्तार.
– सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंधेरीदरम्यान चालणऱ्या ४४ सेवा गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील.
– सध्या पनवेल आणि अंधेरीदरम्यान चालणाऱ्या १८ सेवा गोरेगावपर्यंत विस्तारित केल्या जातील.
– सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रेदरम्यान चालणाऱ्या २ सेवा गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील.
– चौथ्या कॉरिडॉरवरील सकाळच्या पीक अवर्सच्या वेळेत सेवा वाढतील, तथापि एकूण सेवांची संख्या ४० इतकीच राहील.
– मानखुर्दपासून सुरू होणारी मूळ सेवा आता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून सुटेल.
———————————————————
एसी लोकलचे वेळापत्रक :
व्ही-४ वाशी येथून ०४.२५ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-१३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५.१८ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-२४ पनवेल येथून ०६.४५ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ८.०८ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-५२ पनवेल येथून ०९.४० वाजता सुटणारी लोकल.
पीएल-७९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०४ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-७८ पनवेल येथून १२.४१ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १४.१२ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-११६ पनवेल येथून १५.४५ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-१४५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १७.०८ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-१४४ पनवेल येथून १८.३७ वाजता सुटणारी लोकल.
पीएल-१७५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.०० वाजता सुटणारी लोकल.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …