पाटणा – बिहारमध्ये ‘हत्तींचा सरदार’ या नावाने ओळखले जाणारे आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आपल्या हत्तींच्या नावावर करणारे अख्तर इमाम यांची बुधवारी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येची ही घटना दानापूरच्या फुलवारी शरीफ परिसरातील जानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुर्गियाचकमध्ये घडली. अख्तर इमाम यांच्यावर एका मागून एक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्या पोट आणि कपाळावर आठ गोळ्या मारण्यात आल्या. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वीही अख्तर इमाम यांच्यावर हल्ला झाला होता. जमिनीशी संबंधित वादातून त्यावेळी हल्ला झाल्याचे समोर आले होते. यावेळीही जमिनीच्या कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवारी अख्तर आपल्या गजराजांसह काम करीत होते. त्यावेळी आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्यांच्या फैरी झाडल्या. एका मागून एक झाडलेल्या आठ गोळ्यांमुळे त्यांच्या शरीराची अक्षरश: चाळण झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत पाटणा येथील एम्समध्ये नेले; मात्र त्यांना तिथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. अख्तर इमाम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …