‘स्पा मसाज’ साठी विचारणा : उत्तरात मिळाली १५० कॉलगर्ल्सची रेटलिस्ट!

दिल्ली महिला आयोगाच्या
अध्यक्षांना अनोखा अनुभव
नवी दिल्ली – दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना सोशल मीडियावर नुकताच अनोखा अनुभव आला. स्वाती मालीवाल यांना जस्ट डायलवर स्पा मसाजसाठी माहिती मिळवायची होती, मात्र त्यांना १५० हून अधिक कॉलगर्ल्सचे दर सांगण्यात आले. मालीवाल यांनी ट्विटरवरून ही गोष्ट शेअर केली आहे. स्वाती मालीवाल यांनी या ट्विटमध्ये या मेसेजेसचा स्क्रिनशॉटही पोस्ट केला आहे.
स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले आहे की, आम्ही जस्ट डायलला कॉल करून स्पा मसाजची खोटी चौकशी केली, त्यानंतर आमच्या फोनवर असे ५० मेसेजेस आले, ज्यामध्ये १५० हून अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी करीत आहे, या व्यवसायाला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे?, असा सवाल स्वाती मालीवाल यांनी उपस्थित केला आहे. स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनाच या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्ट डायल स्वत: या प्रकरणात एक पक्षकार आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आयोगाच्या टीमला मिळालेल्या एका मेसेजमध्ये स्पाकडून एका मुलीचा फोटो पाठवण्यात आला होता. त्यामध्ये एकावेळी २५०० रुपये लागतील, तर एका रात्रीसाठी ७००० रुपये लागतील, अशी माहिती देण्यात आली होती. तुम्हाला चांगली सेवा मिळेल. सेवेत तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असेही या मेसेजमध्ये म्हटले होते. एवढेच नाही तर अन्य एका नंबरवरूनही असाच मेसेज आला होता. ज्यामध्ये १४ तरुणींचे फोटो शेअर केले होते आणि तशाच ऑफर्सही देण्यात आल्या होत्या.
इतर सर्व मेसेज लज्जा उत्पन्न होईल, असेच होते. ज्यामध्ये ‘सुंदर आणि तरुण’ भारतीय आणि परदेशी मुलींसोबत सेवेच्या म्हणजेच सेक्सच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. आयोगाने जस्ट डायलवर नोंदणी केलेल्या सर्व स्पा सेंटरची यादी आणि त्यांच्या नोंदणीसाठी लागू असलेल्या मानकांचा तपशीलही मागवला आहे. जस्ट डायलला विशेषत: सेक्स सेवा पुरवण्यासाठी आयोगाच्या टीमला संदेश पाठवणाऱ्या स्पाचा तपशील देण्यास सांगण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …