सोमय्यांचे नवे टार्गेट : विलासराव देशमुखांच्या परिवाराच्या साखर कारखान्यांच्या चौकशीची मागणी

लातूर – भाजप नेते किरीट सोमय्या सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरमध्येही किरीट सोमय्यांनी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अजित पवारांवर आरोप केले; मात्र लातूरमध्ये किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख आणि त्यांच्या परिवाराने ज्या-ज्या साखर कारखान्यांचा व्यवहार केला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. सोमय्यांनी यानिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेस नेत्यांकडे मोर्चा वळवला आहे. लातूरमधील साखर करखान्यांच्या व्यवहाराची चौकशी करून डिसेंबरअखेर भ्रष्टाचार समोर आणणार आहे. विलासराव देशमुख आणि त्यांचा परिवार यांनी देखील ज्या साखर कारखान्यांचे व्यवहार केले आहेत, त्याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. माफिया पद्धतीने लातूर जिल्हा बँक काँग्रेसने ताब्यात घेतली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …