सुरेश धस म्हणतात, कोर्टात बघू!

आष्टी – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर एक हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. मलिक यांच्या या आरोपाला सुरेश धस यांनी उत्तर दिले आहे. माझी संपत्ती चार कोटींची आहे. मलिक यांनी माझी संपत्ती घ्यावी. मला पाच पन्नास द्यावेत म्हणजे माझे कर्ज तरी फिटेल, असे सांगतानाच मलिक यांच्यावर मला आता अब्रुनुकसानीचा दावा करावा लागेल, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला आहे.
नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन थेट सुरेश धस यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. त्याला सुरेश धस यांनी उत्तर दिले आहे. एक हजार वगैरे आणि ईडी एवढ्या लांब आम्हा छोट्या माणसाला कशाला नेऊन घालता हो? काहीही बोलायचे. कुठला तरी माणूस माहिती देतो त्याच्या आधारावर जबाबदार मंत्र्याने बोलावे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. मलिकांना यापूर्वी अशाच बेताल आरोपांप्रकरणी माफी मागावी लागली आहे असे धस म्हणाले. मलिकांकडे पुरावे काय आहेत?, रेकॉर्ड आहे का?, कालपर्यंत ते माझे नावही घेत नव्हते. आज नाव घेतले का?, नाव घेतले तर त्याला अब्रुनुकसानीच्या दाव्यातून उत्तर देता येईल. मला त्यांच्यावर दावा करावा लागेल, असे धस म्हणाले. काही नसताना कपोलकल्पित काही तरी बोलणे हेच याला म्हणता येईल, असेही त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …