ठळक बातम्या

सिल्लोड शहराजवळील अपघातात ६ जणांचा मृत्यू; १४ गंभीर जखमी

औरंगाबाद – जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. पिकअप आणि ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य १४ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथून लग्न लावून परतणाऱ्या पिकअपने (क्रमांक एमएच-२०, सीटी-२९८१) उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे, तर ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने ट्रॅक्टरचा मागचा भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
सिल्लोड शहराजवळील मोढा फाटा येथे ही दुर्घटना घडली. या अपघातात ठार झालेल्यांची नावे अशोक संपत खेळवणे (५२), संगीता रतन खेळवणे (३५), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (४५), संजय संपत खेळवणे (४२) जिजाबाई गणपत खेळवणे (६०), रंजनाबाई संजय खेळवणे (४०) सर्व जण मंगरुळ, ता. सिल्लोड येथील राहणारे असून जखमींची नावे कायाबाई भास्कर खेळवणे (४०), आदिनाथ शेषराव खेळवणे (४५), गणेश सुखदेव बोर्डे (१९), आकाश रमेश बोर्डे (१८), कृ षिकेश गोविंदराव आरके (२०), संतोष गणपत खेळवणे (३०) धुलाबाई नारायण बोर्डे (५०), दुर्गाबाई दत्तायत्र खेळवणे (४५), सुलोचना आत्माराम खेळवणे (५५), ओंकार रतन खेळवणे (१६), कलाबाई बापू मस्के (५०), सुभाष रमेश खेळवणे (४५), सार्थक आदिनाथ खेळवणे (८), सुरेश विठ्ठल खेळवणे (५०) अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमींवर सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ९ जणांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …