सहकार टिकवण्यात स्व. शिवाजीराव नागवडेंचा मोलाचा वाटा – शरद पवार

श्रीगोंदा – स्व. शिवाजीराव नागवडे यांनी स्वत:चे आयुष्य झिजवत सर्वसामान्य शेतकऱ्यांची सेवा केली. श्रीगोंद्यात शेतकऱ्यांसाठी सहकारी कारखान्याची उभारणी करीत कारखान्याच्या माध्यमातून शिक्षणाचे दालन उभे करून तालुक्याचा विकास केला असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले. श्रीगोंदा कारखाना येथे सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजीमंत्री बबनराव पाचपुते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पवार पुढे बोलताना म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात सहकार चळवळ टिकून ठेवण्यासाठी आबासाहेब निंबाळकर, तसेच भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर स्व. शिवाजीराव नागवडे यांचादेखील मोलाचा वाटा आहे. स्व. नागवडे बापूंनी बेलवंडी येथील डाहाणुकरांचा खासगी कारखाना घेऊन त्याचे सहकारी कारखान्यात रूपांतर केले. कारखाना उभारण्यासाठी अहोरात्र कष्ट करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले. तालुक्यात कारखान्याच्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री आणत तालुक्याचा विकास केला. बापूंचा आदर्श समोर ठेवून तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन श्रीगोंद्यातील नेत्यांना त्यांनी केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …