सर्व यंत्रणा कामाला लावा – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर – फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होणार आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून १५ दिवसांत चौकशी करावी, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागातील बरीच कामे झाली. त्यापैकी ६५०० कोटींच्या कामांची चौकशी होणार आहे; पण या चौकशीला दोन वर्षे का लावली? असा सवाल बावनकुळे यांनी विचारला. आताही एक महिना नाही, तर सर्व यंत्रणा वापरून त्वरित चौकशी करावी, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघत आहेत, म्हणून ही चौकशी केली जात आहे. फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी ऊर्जा विभागाच्या कामाचे कौतुक केले होते. आता त्याच कामांची चौकशी के ली जात आहे; पण यातून काहीही निघणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
ही चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उशीर का केला?, असा प्रश्न बावनकुळे यांनी विचारला. वास्तविक चौकशी करण्याची धमक या सरकारमध्ये नाही, असेही ते म्हणाले. चौकशीसाठी पोलीस, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दक्षता विभाग या सर्वांना कामाला लावावे. त्यामुळे १ डिसेंबरपूर्वी चौकशी होईल. फडणवीस सरकारमधील ऊर्जा खात्याची कामगिरी एक नंबर होती. हे राज्याची जनता सांगेल. यापूर्वी फडणवीस सरकारमधील जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी झाली. त्यातून काहीच बाहेर आले नाही. ऊर्जा विभाागाच्या चौकशीचेही हेच होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जाखात्याची कामे सर्वोत्कृ ष्ट झाली. आता त्यांच्याकडे काहीच कामे नसल्याने अशी ओरड सुरू आहे; पण त्यातून काहीही बाहेर येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …