अहमदाबाद/रोम – कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती रविवारी (३१ ऑक्टोबर) साजरी झाली. देशभरात हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी व्हिडीओ संदेश जारी केला. राष्ट्रीय एकता दिवसाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतानाच सरदार पटेल फक्त इतिहासातच नाही, तर सर्व भारतीयांच्या हृदयातही आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये जी-२० शिखर संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते गुजरातमधील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
भारत हे फक्त एक भौगोलिक स्थान नाही. आदर्श, संकल्पना, सभ्यता-संस्कृतीला मानणारे परिपूर्ण राष्ट्र आहे. जिथे आपण १३० कोटींपेक्षा जास्त भारतीय राहतो तो भूभाग आपल्या स्वप्नांचा, आपल्या आकांक्षाचा अखंड हिस्सा आहे. शेकडो वर्षांपासून भारतीय समाज, परंपरामध्ये लोकशाहीचा जो मजबूत पाया उभारला, त्यामुळे एक भारताची भावना समृद्ध झाली. पण या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला विकासावर लक्ष ठेवावे लागेल. तसे झाले तर देशाचा विकास होईल, असे मोदी व्हिडीओ संदेशात म्हणाले.
दुसरीकडे, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यासाठी गुजरातमधील केवडिया याठिकाणी पोहोचले होते. तिथे त्यांनी सर्वांत आधी सरदार पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला वंदन केले. या कार्यक्रमामध्ये भारतीय हॉकी संघाचे कप्तान मनप्रीत सिंग यांच्या व्यतिरिक्त तिन्ही सैन्य दलांचे अधिकारी तसेच ऑलिम्पिकमधील वेगवेगळ्या खेळांत पदकांची कमाई करणारे खेळाडू उपस्थित होते. यावेळी अमित शहा म्हणाले की, सरदार वल्लभाई पटेल यांचे जीवन सर्वांना प्रेरणा देते.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …