समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून दिलासा


मुंबई- ड्रग्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोप केल्यामुळे हे प्रकरण गंभीर झाले. समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. समीर वानखेडे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चौकशी करायचीच असेल तर सीबीआय किंवा एनआयएने करावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य करत हायकोटानेसमीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. कोणतीही तूर्तास कठोर कारवाई करण्यास हायकोर्टानेराज्य सरकारला मनाई केली आहे. आलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून वानखेडे यांच्या विरोधात अटकेची कारवाई करायची असेल, तर त्यांना त्याची ३ दिवस आधी नोटीस देणेराज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना बंधनकारक असणार आहे. असे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
समीर वानखेडे यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ४ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. प्रभाकर साईल, ॲड. सुधा द्विवेदी, ॲड. कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी आहेत. समीर वानखेडे यांची चौकशी ४ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर आणि पोलीस उप निरीक्षक प्रकाश गवळी या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. वानखेडेंच्या चौकशीसाठी राज्याकडून एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे, तर वानखेडे यांनी सीबीआय आणि एनआयएनेचौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी प्रकरणात समीर वानखेडे यांना हायकोर्टानं दिलासा दिला आहे. सध्या कोणतीही कारवाई होणार नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …