संभाजी ब्रिगेड पुढच्या महिन्यात राजकीय भूमिका जाहीर करणार

महानगरपालिका निवडणुकांमध्ये पर्याय?
पुणे – मराठा आरक्षणासाठी लढा देणारी संभाजी ब्रिगेड पुढील महिन्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. संभाजी ब्रिगेड महानगरपालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये कुणासोबत युती करायची आणि कु णासोबत नाही?, याबाबतची भूमिका संभाजी ब्रिगेड जाहीर करणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महानगरपालिका निवडणुकीत पर्याय बनणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या ३० डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडची मुंबईत बैठक होणार आहे. यावेळी किती महानगरपालिकांच्या निवडणुका लढवायच्या आणि कुणासोबत युती करायची?, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच ३० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडकडून राजकीय भूमिका जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे रंगशारदा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते येणार असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा मेळावा म्हणजे संभाजी ब्रिगेडचे शक्तिप्रदर्शन असणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या या मेळाव्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागांवर लक्ष
सध्या २०११च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान १६ तर जास्तीत जास्त ६५ सदस्य संख्या आहे, तर महानगरपालिकांमध्ये किमान ६५ तर जास्तीत जास्त १७५ पर्यंत सदस्य संख्या आहे. मुंबई महानगरपालिकेतही ही संख्या २२७ आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशात २०२१ची जनगणना अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान १५ महानगरपालिकांच्या तसेच सुमारे १०० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनेही दंड थोपाटले असून, त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडची शहरी आणि ग्रामीण भागांत मोठी क्रेझ आहे. तरुणांची मोठी फळी संभाजी ब्रिगेडकडे आहे. त्यामुळेच संभाजी ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …