श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी

मुंबई – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेकडून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचा बुधवारी येथे सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडेंचा सत्कार केला. समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभे राहायला हवे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाब मलिक यांच्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली. सकाळी दहाच्या सुमारास शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले आपल्या समर्थकांसह येथील एनसीबीच्या कार्यालयासमोर दाखल झाले. थोड्याच वेळात समीर वानखेडे कार्यालयामध्ये आले. यावेळी कार्यालयाच्या समोरच वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिवप्रतिष्ठाकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. वानखेडेंना यावेळी शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. समीर वानखेडेंनी या सर्व गोष्टींचा स्वीकार केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …