पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेतील ठरावांचे पत्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शुक्रवारी दिले. ऊस परिषदेतील या मागण्यांकडे ना सरकार दुर्लक्ष करू शकते ना साखर कारखानदार असे ते म्हणाले. राजू शेट्टी यांनी यावेळी एकरकमी एफआरपी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ, साखर कारखान्यांवरील कारवाई, महापुराच्या काळातील नुकसानाची मदत यावर भाष्य केले. साखर आयुक्तांनी एकरकमी एफआरपी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. केंद्र सरकारने साखरेचे भाव ३७०० रुपये करावेत, असेही शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांवर साखर कारखान्यांनी बोजा टाकू नये, अशी मागणी देखील त्यांनी केली. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला निधी देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आडवा जो येईल त्याला तुडवणार, असा इशारा त्यांनी दिला.
किरीट सोमय्यांनी इतर ४३ कारखान्यांची यादी डोळ्यांसमोरून घालावी असा सल्ला देतानाच ही यादी सोमय्यांनी का बघितली नाही? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. विक्री झालेल्या ६५ कारखान्यांच्या यादीसंदर्भात विचारले असता हे कारखाने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही विकले गेले आहेत. तेव्हा त्या मंत्रिमंडळात अजित पवार होतेच. किरीट सोमय्यांनी फक्त मोजकी नावे घेऊ नयेत. आम्ही ५ वर्षांपूर्वी याच कारखान्यांची यादी दिली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यात पुढे काही झाले नाही. पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्यासाठी दहा वेळा तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना भेटलो. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भाजपचे नेते मोजक्याच कारखान्यांच्या चौकशीची मागणी करताहेत असा दावाही त्यांनी केला.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …