शिवाजीराव कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नात तुफान गर्दी

कोरोना नियमांची पायमल्ली
अहमदनगर – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने होताना दिसत आहे. ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, असे असताना राजकीय नेत्यांकडूनच नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून मोठ्या थाटामाटात कार्यक्रमाचे आयोजन होताना दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे खबरदारी घेत निर्बंध लावण्यास राज्य सरकारने पुन्हा सुरुवात केली आहे, मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील बुऱ्हानगर परिसरात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. या लग्नात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते. राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाही कोरोनाचा विसर पडल्याचे दिसते. राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असताना, सर्वसामान्यांना नियम दाखवणारे सरकार यावर काय भूमिका घेणार? सर्वसामान्य माणसांकडून मास्क लावला नाही, म्हणून पाचशे रुपये दंड वसूल करणारे सरकारचे नियम राज्यकर्त्यांना लागू होत नाही का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …