पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करीत असून, ते उपचारांना साथ देत नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृ ती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना कोथरुड येथील दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृ ती चिंताजनक आहे. बाबासाहेबांनी वयाची शंभरी गाठली आहे. वार्धक्यामुळे ते उपचारालाही प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी झालेल्या दोन ते तीन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घरी येऊन पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दोन-तीन कार्यक्रम वगळता त्यांनी नंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. दिवाळी निमित्त होणाऱ्या शस्त्र पूजन कार्यक्रमालाही ते हजर राहिले नव्हते. पहिल्यांदाच ते या कार्यक्रमाला हजर राहिले नव्हते.
बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठल्याने १४ ऑगस्ट, २०२१ रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी राज यांनी बाबासाहेबांचा आपल्या खास शैलीत गौरव केला होता.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …