नियमावलीमध्ये बदल
गर्दी टाळण्याचे आवाहन
शिर्डी – शिर्डीच्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई दर्शनासाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट निर्माण होत आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ याचदरम्यान साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार आता भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ याच कालावधीमध्ये साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. रात्री नऊनंतर राज्यात जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत, जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असेल. पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीला देखील भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच काकड आरती होणार आहे, तसेच मंदिर परिसरात भक्तांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनदेखील मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पंढरपुरातही…
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रशासनानेही दर्शनाच्या वेळेवर बंधने आणली आहेत. रात्री ९ वाजता विठूरायाचे मंदिर भाविकांसाठी बंद होणार आहेत. मंदिर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या पंढरपूरमध्ये नाताळच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदिर प्रशासनाने जमाव बंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री ९ नंतर जमावबंदी आदेश दिल्याने विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद राहणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …