ठळक बातम्या

शरद पवार वाढदिवशी ‘आभासी रॅली’द्वारे संबोधित करणार – जयंत पाटलांची माहिती

मुंबई – येत्या रविवारी (१२ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वयाची ८१ वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना असल्यामुळे शरद पवार कुणाकडूनही प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. ‘आभासी (व्हर्च्युअल) रॅली’च्या माध्यमातूनच ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी त्यांना भेटण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून नेहरू सेंटर वरळी येथे ‘व्हर्च्युअल रॅली’ पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व ‘व्हर्च्युअल रॅली’ पक्षाच्या अधिकृ त फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
अ­ॅपचे उद्घाटन होणार
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्या वतीने नवीन उपक्रमाची घोषणा करीत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्त्वाच्या अ­ॅपचे उद्घाटन होणार असून, विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निव्हल’ असा आगामी काळाकरिता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …