मुंबई – ‘बागबान’चे पटकथा लेखक शफिक अन्सारी यांचे बुधवारी (३ नोव्हेंबर) सकाळी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शफिक अन्सारी यांनी १९७४ साली पटकथा लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या निधनाची बातमीसमोर आल्यानंतर बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शफिक अन्सारी यांचे वय ८४ वर्षे होते. शफिक अन्सारी मुंबईतील अंधेरी परिसरात कुटुंबासोबत राहत होते. शफिक अन्सारी यांनी ‘बागबान’सह अनेक चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे. ‘दोस्त’ चित्रपटाची पटकथा त्यांनीच लिहिली होती. त्यानंतर त्यांनी १९९० मध्ये आलेल्या ‘दिल का हिरा’ आणि त्यानंतर ‘इज्जतदार’ या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. नंतर त्यांनी ‘प्यार हुआ चोरी-चोरी’ चित्रपटाची पटकथा लिहिली. २००३ मध्ये त्यांनी चित्रपट निर्माते बीआर चोप्रा यांच्यासोबत ‘बागबान’ चित्रपटासाठी संवाद आणि पटकथा लिहिली. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता.