शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशाने समर्थपणे केला – नरेंद्र मोदी

शेवटच्या ‘मन की बात’मध्ये भांडारकर इंस्टिट्यूटचा गौरव
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२६ डिसेंबर) सकाळी ११ वाजता ‘मन की बात’मधून देशाला संबोधित केले. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा ८४वा भाग होता. २०२१ या वर्षातील ही शेवटची ‘मन की बात’ होती. नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरण, कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राने केलेले प्रयत्न आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष आवाहन केले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. जगातील गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीचा आपण समर्थपणे सामना केला आहे. देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. कोरोनाचा नवा व्हेरिएंट (ओमिक्रॉन) आला असल्याने आपल्याला जबाबदारीने वागावे लागेल. ओमिक्रॉनच्या संसर्गाला रोखण्याच्या निर्धारासह आपल्याला २०२२ मध्ये प्रवेश करायचा आहे, असे नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये म्हणाले.
दरवर्षी मी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. यावर्षी देखील संवाद साधण्यासाठी २८ डिसेंबर ते २० जानेवारी दरम्यान े८ॅङ्म५.्रल्ल ??????????????या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. यासाठी ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक नोंदणी करू शकतात. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये पुण्यातील भांडारकर रिसर्च इंस्टिट्यूटचा गौरव केला. भांडारकर इंस्टिट्यूटने महाभारतावर ऑनलाइन कोर्स सुरू केला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘मन की बात’मधून त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘भांडारकर’ संस्थेने महाभारताचे महत्त्व अधोरेखित करणारा ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. देशभरातील लोकांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. या कोर्समध्ये जो कंटेट शिकवला जातो तो तयार करण्याची सुरुवात शंभर वर्षांपूर्वीच झाली होती, असे मोदींनी स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …