संजय राऊतांचा घणाघाती सवाल
मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली होती. शेलार यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. ‘व्हायब्रंट गुजरात’साठी ते रोड शो करणार आहेत. भाजपला हे चालते का?, असा सवाल संजय राऊत यांनी शेलार यांना केला आहे. भाजपच्या आरोप-प्रत्यारोपांना काही अर्थ नाही. हा पोटशूळ आहे. ममता बॅनर्जी आल्या. उद्योगपतींना भेटल्या. मुंबई औद्योगिक नगरी आहे. या उद्योगपतींचे देशभरात उद्योग आहेत. ते सगळीकडे उद्योग करतात. ममतांनी म्हटले कोलकात्यातही लक्ष द्या. त्यात चुकले काय?, असा सवाल राऊत यांनी केला.
ममता बॅनर्जी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का?, ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असे जे म्हणत आहेत, ते मूर्ख लोक आहेत. भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
तेव्हा मिरच्या का झोंबल्या नाही?
मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला पळवले. आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर गुजरातला गेले, तेव्हा हे लोक का गप्प बसले?, डायमंड प्रकल्पासह अनेक प्रकल्प मुंबईतून गुजरातला गेले. त्यावेळच्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल महाराष्ट्रात आल्या होत्या. मुंबईत काय ठेवलेय, गुजरातला चला असे त्या म्हणाल्या होत्या. ही ओरबाडण्याची भाषा आहे. ममता बॅनर्जी प्रेमाने आल्या. आम्हाला भेटल्या ही पोटदुखी आहे. योगी आदित्यनाथ इथे आले. सिने उद्योग लखनऊला नेणार म्हटले, तेव्हा का यांना मिरच्या झोंबल्या नाहीत?, हे ढोंग बंद करा नाही, तर तुमच्या ढोंगावर लोक लाथा मारतील, असा इशारा त्यांनी दिला.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …