ठळक बातम्या

विराटच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याची धमकी देणारा निघाला सॉफ्टवेअर इंजिनिअर

मुंबई – भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कामगिरी केली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईत आणले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव रामनागेश अलीबथिनी असून, तो २३ वर्षांचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे लज्जास्पद कृ त्य करणारा हा आरोपी सुशिक्षित असून, सध्या त्याचे शिक्षण सुरू आहे. याआधी तो फूड डिलिव्हरी ॲपसाठी सॉफ्टवेअरचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे समोर आले आहे.
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानविरोधात पराभव झाला होता. टीम इंडियाच्या पाकिस्तानविरोधातील पराभवानंतर या घटनेला धार्मिक रंग देत मोहम्मद शमीला टीकेचा धनी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या समर्थनात अनेक जण उभे राहिले होते, त्यापैकी विराटही एक होता.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील शमीला पाठिंबा दिला; मात्र काही माथेफिरूंनी विराटला लक्ष्य केले. एवढे करूनही हे नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी ट्विटरवर विराटच्या अवघ्या १० महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. त्यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देण्यात आल्याचे दिसत होते. इतकेच नव्हे, तर विराट आणि अनुष्काबद्दलही चुकीचे भाष्य केले होते. या स्क्रीनशॉटबद्दल नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …