मुंबई – काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे. राज्य विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नक्की झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पृथ्वीराज चव्हाण सोमवारी विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी (२७ डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरायचा असून, मंगळवारी (२८ डिसेंबर) अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाणांचे नाव या पदासाठी निश्चित झाले असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे, पृथ्वीराज चव्हाण रविवारी थेट दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी पोहोचले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.
अवश्य वाचा
गडचिरोलीत पुन्हा वाघिणीची शिकार?
नखे, शीर काढून वाघिणीला जमिनीत पुरले गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे …