नाशिक – अखेर नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दरम्यानच विद्रोही साहित्य संमेलन घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकमध्ये ३ ते ५ डिसेंबरदरम्यान ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. याच काळात म्हणजे ४ व ५ डिसेंबर रोजी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीची बैठक टिळक वाचनालय येथे गुलामभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला पाठवलेल्या पत्रातील भूमिकेवर आधारित, दिल्ली शेतकरी आंदोलन समर्थनार्थ आणि केंद्र सत्तेच्या फॅसिझमविरोधात, संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन ४ व ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये भरवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी संमेलनाच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. विविध समिती प्रमुखांनी कामाचा आढावा मांडला. संमेलन यशस्वी करण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी सूचना केल्या. विद्रोही साहित्य संमेलनासाठी नाशिक मर्चंट बँकेत खाते उघडल्याचे सांगण्यात आले. संमलेनाच्या जागेत स्टॉल्स उभारणीसाठी तीन हजार रुपये शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …