विदर्भातील प्रमुख शहरांना मिनी मेट्रोने नागपूरशी जोडणार – गडकरींची घोषणा

अमरावती – विदर्भातील शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. पुढील दीड वर्षात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. येथे आयोजित एका महामार्गाच्या लोकार्पण आणि भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी मंगळवारी ही नवी घोषणा केली. १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आठ डब्यांच्या या रेल्वेतील इकॉनॉमी श्रेणी डब्यातील प्रवासाचे दर बसच्या दराएवढेच माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. श्रीक्षेत्र बहिरम येथे १ किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी निधीबरोबरच मोर्शी, वरूड, चांदूर बाजार येथील बायपास मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
मंत्री गडकरी म्हणाले की, पुढील दीड वर्षात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक शहरे उत्तम रस्त्यांनी जोडली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …