ठळक बातम्या

विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू; अमरावतीत खळबळ

अमरावती – भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी रंगरंगोटी केली जात असताना, चार कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागल्याने या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अमरावतीत प्रवीण पोटे यांचे पीआर पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची रंगरंगोटी करीत होते. या प्रवेशद्वाराजवळून उच्च दाबाची वीजवाहक तार गेली आहे. हे कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करीत असताना, शिडीला विद्युत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना भयंकर शॉक लागला. त्यामुळे हे चारही कर्मचारी शिडीला चिकटले. त्यानंतर जोराचा झटका बसल्याने हे चारही कर्मचारी खाली कोसळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत अक्षय सावरकर (२६), प्रशांत शेलोरकर (३१), संजय दंडनाईक (४५) आणि गोकुळ वाघ (२९) असे चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते चौघेही महाविद्यालयामध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. महाविद्यालय प्रशासनाने बाहेरून मजूर न बोलावता थेट कर्मचारीच रंगरंगोटीसाठी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …