ठळक बातम्या

वानखेडेंप्रकरणी नवाब मलिकांचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

बिनशर्त माफी
मुंबई – नाकार्ेटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे संचालक समीर वानखेडे यांच्याशी संबंधित प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात खेद व्यक्त केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले आहे. याविषयीचे हमीपत्र त्यांनी न्यायालयात सादर केले आहे. तसेच यानंतर वानखेडे यांच्याविषयी कोणतेही व्यक्तिगत विधान करणार नाही, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. नवाब मलिक यांनी चार पानांचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे. ज्येष्ठ वकील ॲस्पी चिनॉय यांच्यामार्फत त्यांनी उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडले. मी फक्त माझ्या सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. कोणाविषयी वैयक्तिक मत व्यक्त केले नाही. यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण याबाबत बिनशर्त माफी मागतो. यापुढे अशी विधाने करणार नाही, याची हमी देतो, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असा आक्षेप नोंदवणारा अर्ज ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. त्यावर न्या. शाहरूख काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याविषयी विचारणा केल्यानंतर मलिकांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …