कणकवली (सिंधुदुर्ग) – आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का?, शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अटकेचे वॉरंट निघाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. नितेश राणे यांच्या मांजरीसारख्या आवाजावरूनही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, नारायण राणे भडकले. शिवसेना नितेश राणेंना अटक करण्यासाठी सूडभावनेने वागत असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला.
नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढण्यावरून नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मांजराचा आवाज कोण काढते?, आदित्य ठाकरेंचा मांजरेचा काही संबंध आहे का?, वाघाची मांजर कधी झाली?, आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केले. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का?, ते तसे बोलतात का?, मांजरीचा आवाज काढला, तर राग का यावा, असा सवाल नारायण राणे यांनी केला. यावेळी त्यांना नितेश राणे कुठे आहेत?, असा सवाल केला असता, राणे भडकलेच. कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का?, असा प्रश्न असतो का?, तुम्हाला का सांगू जरी मला माहीत असेल तरी?, असा सवालही त्यांनी केला. नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, पोलीस एवढे का आले याची माहिती घ्या. दहशतवादी आले की, पाकिस्तानातून कोणी आले?, अशा घटना घडत असतात. नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी. नाव गोवायचे आणि ३०७ लावायचे, निवडणूक संपेपर्यंत डांबून ठेवायचे, असा यांचा प्लॅन आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
अजित पवारांना ओळखत नाही
नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार?, मी नाही ओळखत अजित पवारांना. त्यांचा काय संदर्भ देताय?, असा सवालच राणे यांनी केला. यावेळी त्यांना विधान भवनाबाहेर नितेश राणे यांनी केलेल्या वर्तनावर प्रश्न विचारण्यात आला, तसेच अजित पवार यांनी मंगळवारी सभागृहात सदस्यांना समज दिल्याचेही राणेंना सांगण्यात आले. त्यावर राणे उसळले. माझी मर्यादा काय आहे, हे मला माहीत आहे. मी बाकी कोणाची पर्वा करीत नाही. कायद्याने वागायचे मला कळते. माझ्या पदाचा मी दुरुपयोग केला नाही. एवढी वर्षे मी लोकप्रतिनिधी आहे. मी अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नाही. विधान भवनाच्या पायरीवर बोलण्यावर बंधन नाही, असे राणे म्हणाले.
प्रभूंची औकात काय?
राणे नेहमी समोर येऊन बोलतात. आता नितेश राणे कुठे दिसत नाहीत, असा टोला शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लगावला होता. प्रभू यांच्या या टोल्याची राणेंनी खरपूस समाचार घेतला. कोण सुनील प्रभू?, त्यांची औकात काय?, या ना समोरा समोर येऊन बोला. तुम्हाला इतिहास माहीत नाही. तुम्ही पीए होता. पीएचे काम लिहायचे असते. बोलायचे नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
कोकणात काही भागांत नाचे आहेत
भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींची नक्कल केल्यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याचे पडसाद उमटत आहेत. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरूनही भास्कर जाधव यांनी टीका केल्यानंतर नारायण राणे यांनीही जाधवांवर खरपूस टीका केली. राणेंनी भास्कर जाधव यांना थेट नाच्याची उपमा दिली. भास्कर जाधवांच्या नक्कलीला नक्कलीतून उत्तर दिले जाईल, असे नारायण राणे म्हणाले. कोकणात काही भागांत नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात, त्यातला तो प्रकार त्या दिवशी विधानसभेत झाला असे म्हणत, राणेंनी जाधवांचा समाचार घेतला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …