बीड – भाजपचे एकेकाळचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी राज्यभरातून विविध नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आलीे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहताना एक भावूक ट्विट केले. त्यात ते म्हणाले, अप्पा, तुम्ही आज आमच्यात नाहीत, पण वंचितांच्या कल्याणाचा तुम्ही घेतलेला वसा आम्ही प्राणपणाने जपणार आहोत. धनंजय मुंडे यांचे हे भावूक ट्विट सध्या चर्चेत आहे.
मुंडे यांच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी सकाळीच ट्विट केले. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला. त्यात त्यांनी लिहिलेय, स्वर्गीय अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे. तो जपुयात, पुढे नेऊयात. धनंजय मुंडे यांनी शनिवारीदेखील एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणतात, अप्पा, तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती, पुण्यतिथी असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती-भोवती असल्याचे जाणवते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …