मुंबई – आठवण ठेवा, सरकार नाही बरखास्त केले, तर नाव बदलून ठेवा, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिला होता. याआधीही भाजप नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची विधाने केली होती. या सर्व विधानांचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत यांनी बुधवारी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. राष्ट्रपती राजवटीची चर्चा कोण करतेय माहीत नाही. अशी चर्चा करणारे मूर्ख आहेत. राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. १७० आमदारांचा पाठिंबा आहे. अशा किरकोळ गोष्टींवर राष्ट्रपती राजवट लावण्याची कुणी भाषा करीत असेल, तर त्यांनी देशाची घटना वाचून घ्यावी, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी राज्यपालांच्या पत्रावरही भाष्य केले. राज्यपाल सदगृहस्थ आहेत. ते एका राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्यांच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. राज्यघटनेचे पालन करणारे प्रमुख पद त्यांच्याकडे आहे. ते राज्यात आल्यापासून आम्ही त्यांचा आदरच करतो. त्यांचा अनादर व्हावा, असे कृ त्य आम्ही केले नाही. ते वडीलधारे आहेत, पण त्यांच्यावर दबाव कोण आणतंय? ते त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …