ओरोस (सिंधुदुर्ग) – कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गेले असता ते बोलत होते.
ज्या-ज्या जिल्ह्यात लोकांनी जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या लोकांच्या हातात दिल्या त्या बँका सुस्थितीत आहेत. मात्र ज्या बँका चांगल्या लोकांच्या हात गेल्या नाहीत त्या अडचणीत आलेल्या आहेत, असे अजितदादांनी सांगितले. ज्या काही बँका चांगल्या चालल्या आहेत, त्यात तुमच्या माझ्या कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका उत्तम चालल्या आहेत. अशाप्रकारे या बँका चांगल्या चालण्यासाठी आपले बहुमोल असे मत द्या. महाविकास आघाडीच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कुठलीही संस्था चालवणारा प्रमुख कोण असतो, यावर तिचे यशापयश अवलंबून असते. शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखे बँकेला जपले, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवराम भाऊ जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकाराचे मोठे काम करून ठेवले आहे. त्यांच्याशिवाय या जिल्ह्याचा इतिहास लिहिताच येणार नाही. हेच ध्यानात घेता यावेळी अजित पवारांनी शिवराम भाऊ जाधवांच्या कार्याला उजाळा दिला.
गाडीचे सारथ्य महिलेकडे
अजित पवारांच्या या दौऱ्यात एक लक्षवेधी घटना घडली ती म्हणजे अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य हे महिला चालकाने केले. मागे अजित पवार बसले होते, त्यावेळे स्टेअरिंगवर एक महिला चालक दिसून आली. तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालक अजित पवारांची गाडी चालवताना दिसून आल्या. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून आले. बेधडक अजितदादांच्या गाडीचे स्टेरिंग एका महिलेच्या हातात बघून सर्वांनाच कौतुक वाटले. उपमुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट चालवणाऱ्या या रणरागिणीने या दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …