राज ठाकरे यांच्याकडून आगामी १० दिवसांमधील सर्व कार्यक्रम रद्द

सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी दहा दिवसांतील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे. ‘शिवतीर्थ’ येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. मात्र, तरीही खबरदारी म्हणून राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांसाठी त्यांच्या भेटी रद्द केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर तातडीने इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे. सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील १० दिवसांतील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …