पाच हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन
औरंगाबाद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीला मंजुरी मिळाली आहे. तसेच ५ हजार हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करू, अशी घोषणाच उदय सामंत यांनी केली आहे. राज्यात ८ हजार प्राध्यापकांची भरती ७ महिन्यांत पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे प्राध्यापक रुजू होतील, असे सामंत यांनी जाहीर केले. विद्यापीठे-महाविद्यालयांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सूचना केली जाईल, असे आश्वासनही सामंत यांनी दिले आहे.
राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. यासाठी राज्यात पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांत आंदोलनदेखील करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राध्यापक भरतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. राज्यात पहिल्या टप्यातील २०८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पदे भरण्याला मान्यता देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्यातील २०८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पदे भरण्याला मान्यता देण्यात आली आहे, असे ट्विट सामंत यांनी केले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …