मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती; पण राज्यातील कोरोनास्थिती आता नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यातील रुग्णसंख्येत अंशत: वाढ झाल्याचे दिसून आले. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात बुधवारी ११९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत राज्यामध्ये १५९९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर राज्याचा कोरोनामुक्ती दर ९७.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या १५ हजार ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात १,८७,२८६ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत, तर ८९५ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …