राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील महाविद्यालयांबाबत बुधवारी मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यातील विद्यापीठांतील, महाविद्यालयांतील परीक्षा या १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत कोविड-१९ संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थी पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासोबत आरोग्य सुरक्षिततेबद्दलही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृ षी विद्यापीठे नाही, तर इतर खासगी विद्यापीठांनासुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील, तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयासोबत वस्तीगृहेदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यांतून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात महाविद्यालये बंद केली, तरी ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …