राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायचीत की नाही?; आज निर्णय जाहीर होणार!

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे बंद ठेवण्यात आलेली शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरू झालेली असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने शाळेच्या वाटेवर खोडा घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील पहिली ते नववीच्या आणि अकरावीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. आता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही, यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी ४ वाजता निर्णय जाहीर होणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्यासमवेत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत कोविड-१९ संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासोबत आरोग्य सुरक्षिततेबद्दल सविस्तर चर्चा झाली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे वाढता कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांबाबत देखील असाच निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …