कल्याण-डोंबिवली – राज्यातला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण बरा झाला आहे. त्याला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. संबंधित रुग्ण ३३ वर्षांचा असून, तो मेकॅ निकल इंजिनिअर आहे. त्याची ओमिक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र योग्य उपचार घेतल्यानंतर आता त्याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. संबंधित रुग्णाला ७ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. मेकॅ निकल इंजिनिअर असलेला हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ डिसेंबरच्या दरम्यान या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …