ठळक बातम्या

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी

साखर कारखान्याच्या व्यवहारात घोटाळ्याचा संशय
मुंबई – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना आता आणखी एका मंत्र्यांची ईडीने चौकशी केल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांमागे सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू आहे. त्यात आता प्राजक्त तनपुरेंचीही भर पडली आहे. त्यामुळे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्जे दिली होती. त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा नंतर २०१२ साली लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत २६ कोटी होती मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनीने १३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे. या अनुषंगाने ईडी चौकशी करीत आहे. प्राजक्त तनपुरे यांना समन्स देऊन बोलावण्यात आले होते. त्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …