मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवर आक्षेप घेणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना तिखट भाषेत पत्र पाठवले होते. त्यावर राज्यपालांनी आपले उत्तर मुख्यमंत्र्यांना पाठवले असून, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेवरच नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्या पत्रात तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद २०८ नुसार नियम तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे, पण तुम्ही अर्धवट माहिती देत आहात. त्याच अनुच्छेदात म्हटले आहे की, जो काही विधिमंडळाचा निर्णय घेतला जाईल, तो संविधानिक असला पाहिजे. संविधानिक प्रक्रिया पार पाडूनच त्याची कार्यपद्धती असली पाहिजे. संविधानाच्या कलम १५९ नुसार राज्य घटनेचे संरक्षण, संवर्धन आणि बचाव करण्याची मी शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भातील नियमात करण्यात आलेले बदल हे प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याने त्याला सद्यस्थितीत मंजुरी देता येणार नाही.
आपण सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ११ महिने घेतले आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ६ आणि ७ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. या सर्वांचा प्रभाव आणि दुरुस्त्यांचे कायदेशीर परीक्षण करणे आवश्यक आहे. मी आतापर्यंत सभागृहाची कार्यपद्धती/ प्रक्रियेसंदर्भात कधीही प्रश्न विचारला नाही. तथापि, संविधानाच्या कलम २०८ मध्ये नमूद केल्यानुसार, प्रथमदर्शनी असंवैधानिक आणि बेकायदेशीर वाटणाऱ्या या प्रक्रियेला संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही. तुमच्या पत्राचा असंयमी आणि धमकावणारा सूर पाहून मी वैयक्तिकरीत्या खूप दु:खी झालो आहे. ते पत्र राज्यपालांचा अपमान आणि बदनामी करणारे आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …