राज्यपालांच्या सक्रियतेमुळे राज्य व्यवस्थित सुरू

रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला
नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले नाहीत. तरीही राज्य व्यवस्थित सुरू आहे, कारण राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे, असा टोला रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नाहीत तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. खरेतर आताच राज्य व्यवस्थित सुरू आहे. त्याचे कारण आहे की, राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. आता मुख्यमंत्री या राज्याच्या खुर्चीवर नसताना राज्य चांगले चालले, तर याचे श्रेय या राज्यातील शांतता, संयमी आणि सहनशील जनतेचे आहे. सरकारचे नाही, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचे विधान शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी केले होते. त्यावर दानवे यांनी भाष्य करणे टाळले. ते अब्दुल सत्तार यांचे वैयक्तिक मत आहे, असे दानवे म्हणाले. सध्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मात्र, भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असे वक्तव्य करून काही तास उलटत नाहीत तोच सत्तारांनी दानवे यांची गळाभेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची गळाभेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्या मतदारसंघातील रेल्वेसंदर्भात मी त्यांना भेटण्यासाठी आलो. जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी, म्हणून मी भेटण्यासाठी आलो होतो. मतदारसंघाचे खासदार झाले, तर आनंद होईल. मी गंभीर नाही, असे दानवे बोलतात. आता मी त्यांना रडत रडत सांगेन, असे मिश्किल विधानही त्यांनी केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …