मुंबई – कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी मिळावी, म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)ची रविवारी (२ जानेवारी) होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परीक्षा झाली नाही. त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत होती ते विद्यार्थीही परीक्षा देऊ शकले नव्हते. सरकारने आणि आयोगाने अशा विद्यार्थ्यांना आणखी एक वर्ष ही परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा नव्याने राबवावी लागणार आहे. मागील वर्षी शेवटची संधी असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे रविवारी (२ जानेवारी) होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयोगने म्हटले आहे. पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा ३९० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती.
महाराष्ट्रात ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादेची अट ओलांडली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात १७ डिसेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आयोगामार्फत रविवारी (२ जानेवारी) घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे.
१७ डिसेंबर रोजी जारी झालेल्या शासन निर्णयामध्ये १ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ दरम्यान ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे, अशा उमेदवारांना दिलासा देण्यात आला असून, ते विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतील आणि त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची संधी असेल. त्यासाठी अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सुद्धा मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांनी २८ डिसेंबर, २०२१ ते १ जानेवारी, २०२२ रात्री १२ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन शुल्कासह भरायचे आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …