यवतमाळमधील शिकाऊ डॉक्टरची हत्या * विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन

यवतमाळ – येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बुधवारी रात्री डॉ. अशोक पाल या एमबीबीएसला शिकणाऱ्या डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर शिकाऊ डॉक्टरांनी एकत्र येत डॉ. अशोक पाल यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तरी डॉ. अशोक पाल यांची कुठल्या कारणाने हत्या झाली ते नेमके कारण अजूनही पुढे आलेले नाही. मारेकऱ्यांना २४ तासांत अटक करू असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी म्हटले होते. मात्र २४ तास झाल्यानंतरही अजूनही मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही शिकावू आंदोलक डॉक्टरांनी आंदोलन पुकारले होते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुख गेटच्या समोर धरणे आंदोलन केले. मृत डॉ. अशोक पाल यांना मरणोत्तर डॉक्टर पदवी देण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा यंत्रणा सुसज्ज करावी, नीटनेटक ी करावी अशीही मागणी आंदोलन डॉक्टरांनी केली. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली.
यवतमाळचे माजी पालकमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेऊन डॉ. अशोक पाल यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत आणि या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली पाहिजे, असे म्हटले. हे प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये चालवावे, अशीही मागणी संजय राठोड यांनी यावेळी केली. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनीही घटनेची गंभीर दखल घेतल्याचे राठोड यांनी सांगितले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …