ठळक बातम्या

म्हाडा परीक्षेबाबतच्या अफवांना बळी पडू नका – जितेंद्र आव्हाड

मुंबई – म्हाडाच्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. काही लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. कुणालाही पैसे देऊ नका. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार आहे, असे सांगतानाच अफवा अशाच सुरू राहिल्या तर वेळ आल्यास मीच ही परीक्षा रद्द करेन, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. यावेळी त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन करताना हात जोडून अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट करून हे आवाहन केले आहे. १२ तारखेला (रविवारी) होणाऱ्या परीक्षेबाबत अफवा पसरवल्या जात आहे. काही लोक पैसेही घेत आहेत असे ऐकायला आले आहे. असे जर कोणी रंगेहात पकडून दिले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. पोलिसांमध्ये दिले जाईल आणि गुन्हे दाखल केले जातील. विद्यार्थ्यांनी कुणालाही पैसे देऊ नयेत, असे आव्हाड यांनी सांगितले.
म्हाडाची परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे. पास झालेल्यांचीही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमचे दिलेले पैसे वाया जातील. मला नाशिक आणि आष्टीवरून फोन आला. आष्टीचा अधिकारी पैसे घेत असल्याचे सांगितले जात आहे. अकोल्याहून फोन आले आहेत. या फसवणुकीला बळी पडू नका. या परीक्षेत कोणताही वशिला चालणार नाही. आमचा विभाग चालू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर रोजगार मिळावा म्हणून आम्ही ही पदे भरली जात आहेत. पण समाजातील काही गुन्हेगारी प्रवृतीचे लोक पैसे घेऊन काही करीत असतील तर हातजोडून विनंती आहे त्यांच्या नादाला लागू नका. तुमचे पैसे बरबाद करू नका. नाही तर वेळ आली तर मी ही परीक्षाच रद्द करून टाकेन, असा इशारा त्यांनी दिला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …