मोलनूपिरावीरबाबत आयएसीएमआरकडून कोणत्याही सूचना नाहीत – अमित देशमुख

मुंबई – मोलनूपिरावीर या नव्या औषधाबाबत गुरुवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या औषधाबाबत आयएसीएमआरकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. अमित देशमुख यांनी गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. नव्या मार्गदर्शक सूचनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर अमित देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधून ही माहिती दिली. काही नवीन मोलनूपिरावीरची चर्चा होत आहे, पण आयसीएमआरकडून स्पष्टता आलेली नाही. औषध वेळेत मिळावे यासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. दुसऱ्या लाटेत जे उपचार देत होतो, तसेच उपचार तिसऱ्या लाटेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे. रुग्णालयांच्या हेल्थ वर्करच्या चाचण्या विहीत कालावधीत नियमित करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सध्या ८२७ बेड्स पुरुषांसाठी आहेत. त्यातील ९५ टक्के बेड्स ऑक्सिजनयुक्त आहेत, तर १५०० पिडियाट्रीक बेड्स आहेत, त्यापैकी ६५० आयसीयू बेड्स आहेत. ८ हजार २२७ बेड्सपैकी २ हजार १२५ आयसीयू बेड्स आहेत. ऑक्सिजन प्लांट बसवले आहेत. तिथे ऑक्सिजनचा साठा ७५ टक्के राखण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात एकूण २५० आरटीपीसीआर लॅब्स आहेत. त्यात शासकीय लॅब्स ८० आणि १७५ खासगी आहेत. त्यामुळे रोज १ लाख ३० हजार चाचण्या करण्याची क्षमता राज्याची आहे. राज्याला १६ लाख आरटीपीसीआर किट्स घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …