पुणे – काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर व्यक्त केलेल्य पश्चातापावर भाई जगताप यांनी टाकास्त्र सोडले आहे. पहाटेच्या अंधारात केलेल्या पापाचा हा पश्चाताप आहे का?, आमचे सरकार एक महिन्यात पडेल की, दोन महिन्यांत पडेल हे सगळे करून थकल्याचा पश्चाताप आहे?, अशी बोचरी टीका भाई जगताप यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी पाच वर्षे राज्याचे आणि मुंबईचे वाटोळे केले आहे. जर तुम्हाला पश्चाताप करायचाच असेल, तर या गोष्टीचा करा की तुम्ही राज्याचे वाटोळे केले. मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार का? याबाबत विचारले असता, भाई जगताप म्हणाले की, मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार हे नवीन नाही, स्थानिक नेत्यांसोबत बोलून आमचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवलेला आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल. पुणे महानगरपालिका स्वबळावर लढणार का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘बाप रे बाप? पुण्याबद्दल काय बोलायचे…’ काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी बद्दल विचारले असता, भाई जगताप म्हणाले की, हा १३६ वर्षांचा परिवार आहे, भांड्याला भांडे लागणारच, तेव्हा काळजी करू नका.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …