ठळक बातम्या

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम आज मुंबईत

औरंगाबाद – राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता इतर आरक्षणांवरूनही वातावरण तापले आहे. त्यातच मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसून येत आहे. मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम शनिवारी (११ डिसेंबर) मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला औरंगाबादेतून सुरुवात होईल. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.
मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम शनिवारी मुंबईवर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधून शनिवारी सकाळी सात वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून मोर्चासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत मुंबईत विराट सभेचे आयोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे. मुंबईतल्या सभेचे ठिकाण मात्र एमआयएमने गोपनीय ठेवले आहे. ओमिक्रॉन हा नवा कोरोना व्हेरिएंट आल्यानंतर राज्यात काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत, त्याच पार्श्वभूमीवर राजकीय सभांना बंदी घालण्यात आली आहे. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडूनही काही नियम राबवले जात आहेत. त्यामुळेच या सभेचे ठिकाण गोपनीय ठेवण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …